ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथे दूध उत्पादकांची विमानातून सहल

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोनवडे, ता.भुदरगड येथील सहकारात नावाजलेल्या प्रा.हिंदुराव पाटील प्रणित जयहिंद सहकार समूहापैकी असणाऱ्या शिवभवानी दुधसंस्था या संस्थेच्या दुग्ध व्यावसायिक उत्पादकांनी हरियाणा वरून मुऱ्हा जातीच्या म्हैशींचा प्रकल्प दुसऱ्यांदा यशस्वी करत दूध उत्पादनवाढीसाठी दुग्धव्यावसायिकांसाठी एक नवा आदर्श उभा केला.

हरियाणा वरून जातिवंत म्हैशींची खरेदी केली असता सर्वांनी विमानातून दिल्ली ते पुणे प्रवास करण्याची इच्छा संस्थापक प्रा.हिंदुराव पाटील यांच्यापाशी व्यक्त केली.आणि त्यांनीसुद्धा सर्वांची विमानाने प्रवासाची सुवर्णसंधी पूर्ण केली.रोज दूध,चारा आणि गोठ्यात असणाऱ्या शेतकरी राजाने विमान प्रवासाने एक वेगळी अनुभूती घेतली.दिल्ली ते पुणे दरम्यानचा यशस्वी प्रवास त्यांनी पूर्ण केला.

यावेळी बोलताना चेअरमन आनंदराव लोकरे यांनी स्वप्नवत प्रवास कथन करत विमान प्रवास हा नक्कीच एक अविसमरणीय प्रवास असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks