मोठी बातमी : सोमय्यांच्या आक्षेपर्ह व्हिडिओप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याचे पडसाद काल पावसाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यानंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरु केला आहे.
एका वृत्तवाहिनीने सोमवारी, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये हे एका महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा दावा केला होता. सोमय्या यांच्या व्हिडिओ वरुन ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
यावर फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल असे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केल्यानंतर त्यावर कार्य़वाही सुरु झाली आहे. मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 व्हिडिओच्या सत्यतेचा तपास करणार आहे. तसेच यासाठी मुंबई पोलीस तांत्रिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेणार आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
सोमय्यांची चौकशीची मागणी
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे,अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही.अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोणाला पाठिशी घालणार नाही
किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.अशाप्रकारच कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही. किरीट सोमय्या यांनी मला पाठवलेल्या पत्रातही तीच मागणी केली आहे.
या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मात्र, संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही.त्यामुळे पोलीस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले