मोठी बातमी : कच्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळे रंगाच्या किमती वाढणार

तेलाच्या किमती वाढल्याने रंग उत्पादक कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या खर्चात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कपातीमुळे तेलाच्या किमती वाढत आहेत. गेल्या काही कालावधीत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. मागच्या आठवड्यात ब्रेंट क्रूड तेल तीन महिन्यांच्या उचांकी स्तरावर म्हणजे 81 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. लिबीया व नायजेरीया यांच्याबाबतीत अडचणीमुळे पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसतो आहे.
जुलैमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा विचार केल्यास किमती 8 टक्के इतक्या वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात अमेरिकेतील मुख्य बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला ब्रेक लावू शकते, असे म्हटले जात आहे. याचाही परिणाम अपेक्षीत आहे. सऊदी अरब आणि रशिया यांनी आपल्या सध्याच्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत जुलैमध्ये 8 टक्केपर्यंत वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाचा वापर रंग उत्पादन कंपन्यांना आपल्या उत्पादनात करावा लागतो. किमती वाढल्या की त्याचा सरळ परिणाम उत्पादन खर्चावर होत असतो. रंगाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.