आजरा : चाफवडे ग्रामस्थांनी चाफवडे हायस्कुल कार्यालयाला ठोकले टाळे

आजरा प्रतिनिधी :
चाफवडे ता.आजरा येथील ग्रामस्थांनी व पालकांनी चाफवडे हायस्कुलच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
अधिक माहिती अशी की , जनता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 12 जून 1990 ला चाफवडे येथे चाफवडे हायस्कुल सुरू करण्यात आले 32 वर्ष ग्रामस्थांनी शाळेला सहकार्य केले व आजही असेच सहकार्य सुरू आहे. उचंगी धरणामुळे आजरा चंदगड उचंगी मार्गे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
त्यामुळे धनगरवाडा, भावेवाडी,चितळे,जेऊर येथील विद्यार्थ्यांना चाफवडेला येनेसाठी रस्ता बंद झाला मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून धनगरवाडा, भावेवाडी,चितळे, जेऊर, आदर्श वसाहत नवीन चाफवडे येथील विद्यार्थ्यांचे वर्ग चितळे येथे सुरू केले.
मात्र सन 2023 -24 पासून चाफवडे येथील हायस्कुल बंद करून जेऊर या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू असून 17 जुलै पासून सदर हायस्कुल बंद असून येथील 23 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.
या पार्श्वभूमीवर येथील पालक व ग्रामस्थांनी आज शाळा कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनाची दखल घेऊन शाळा प्रशासनाने शाळा स्थलांतर रद्द करून शाळा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी केली.
या आंदोलनदरम्यान सरपंच धनाजी दळवी,माजी सरपंच सुरेश पाटील ,विश्वास भडांगे,विजय भडांगे,नारायण भडांगे,प्रकाश ठाकर,निवृत्ती बापट, संजय भडांगे,पांडुरंग ठाकर, प्रकाश माणकेकर, आप्पा भडांगे,पांडुरंग ठाकर सर्व पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान संस्थाचालकांनी हायस्कुल चालवायला जमत नसेल तर आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणीही सभेदरम्यान करण्यात आली तसेच या संदर्भातील निवेदनही मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापूर व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि. प.कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.