ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरच भारी ; तब्बल 36 टक्के विद्यार्थी चमकले यादीत

राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कोल्हापूरचा डंका राज्यात वाजला आहे. तब्बल 36 टक्के विद्यार्थी एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यादीत कोल्हापूरचे 104 विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 62, तर शहरी भागातील 42 विद्यार्थी आहेत.

इयत्ता पाचवीमध्ये शहर विभागात एम. एल. जी. हायस्कूलच्या पूर्वा भालेकरने 94 टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरच्या (महानगरपालिका) शौर्या पाटील आणि अनन्या पोवार यांनी 93.33 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. पाचवीतील ग्रामीण विभागात विद्यामंदिर सुळगावच्या बुशारा शहानवाज मुल्ला आणि केंद्रीय विद्यामंदिर गुडाळच्या विराजराजे मोहिते यांनी 96 टक्क्यांसह राज्य गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांकासह स्थान मिळविले. इयत्ता पाचवीच्या शहरस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील 21 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यांच्या यशाने या शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील यशात दबदबा कायम राहिला आहे.

सक्षम नारिंगेकर (श्री आनंदराव पाटील (चुयेकर) इंग्लिश मिडियम स्कूल), अजिंक्य कागले (कळे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय), राधिका पाटील (विद्यामंदिर मोहाडे-चाफोडी) यांनी 95.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता आठवीमध्ये ग्रामीण विभागामध्ये पार्थ पाटील (पी. बी. पाटील हायस्कूल) याने 93.33 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. शहरी विभागात श्रद्धा कामते (तात्यासाहेब मुसळे विद्यालय 95.33) हिने चौथा क्रमांक मिळविला.

गुणवत्ता यादीतील कोल्हापूरचे अन्य विद्यार्थी : (इयत्ता पाचवी) ग्रामीण विभाग :

मानसी बोनिवाड (विद्यामंदिर खानापूर, 94.66 टक्के), प्रज्वल बेनके (दऱ्याचे वडगाव, 94.66), नंदिनी साळोखे (बोळावी, 94.66), किरण दिवसे (सावरवाडी, 94.66), राजवीर महेकर (वाळवे खुर्द 94.66), संस्कार पाटील (म्हाकवे 94.66), सोहम माने (भादोले 94), हर्ष सुतार (हरपवडे), विभावरी पाटील (आकुर्डे 93.33), अनुष्का पाटील (नावरसवाडी), कार्तिकेय कुंभार (सावर्डे दुमाला), मयुरेश चौगले (अकनूर), समृद्धी पाटील (चरण, 92.66), श्रृती पाटील (आदमापूर), अर्जुन कुंभार (टाकळी), विराज ठाकूर (कडगाव 92), स्नेहश्री पाटील (सांगवडे), शरण्या पाटील (मालगड), सोमय्या नेर्ले (हेरवाड), आराध्या सोरप ( 91.33), मनाली पाटील (गडहिंग्लज), जानव्ही गंगाधरे (म्हाकवे), प्रज्वल खोत (आनूर), क्षितिजा पाटील (पाडळी बुद्रुक), अथर्व डोणे (कुंभोज), मुग्धा सुतार (सरवडे). शौर्य दमाणे (बाचणी), अर्जुन नार्वेकर (सुळगाव), ध्रुव तांबवेकर (आसुर्ले), प्रांजली पाटील (अकनूर), समृद्धी शेळके (कपिलेश्वर), राजवीर वाईंगडे (भादोले), श्रेयांस पाटील (वाशी), श्रावणी दाभोळे (सोनाळी 90.66).

इयत्ता पाचवी (शहरी विभाग)
राजवर्धन पाटील (92.66), ऋतुराज येसारे, अवधूत पाटील (छत्रपती शिवाजी विद्यालय गडहिंग्लज), स्तुती चौगुले (किलबिल विद्यामंदिर गडहिंग्लज 91.33), राजवीर बकरे (वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल 90.66), विदुला बडबडे (इचलकरंजी), अमेय देसाई (गडहिंग्लज), रूद्रा बाबर (गडहिंग्लज), श्रेयांस डोर्ले (कुरूंदवाड), नचिकेत नंदगिरीकर (कोल्हापूर शहर 90), ईश्वरी लोळगे (कोल्हापूर शहर 89.33).

इयत्ता आठवी (ग्रामीण)
चैतन्य ढोणुक्षे (चंदगड 92), मानसी गुरव (चंदगड), मुग्धा सुतार, ऋतुजा गोठे, (पी. बी. पाटील हायस्कूल 90.66), साईराज पाटील (चंदगड), मनाली नवगारे (तुडीये 89.33), श्रावणी पाटील (सरवडे), श्रद्धा सारंग (गारगोटी), जानव्ही पाटील (पी. बी. पाटील हायस्कूल), सुजल कोलके (नांदणी 88.66), श्रेयस कमळकर (88), वैष्णवी घारे (पी. बी. पाटील हायस्कूल), अभिग्यान गिरी (चंदगड 87), नील पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय), मलप्रभा नवगिरे (तुडीये), श्रेयांस पाटील (चंदगड 87), पृथ्वीराज पाटील (पी. बी. पाटील हायस्कूल 88.66), श्रावणी देवरेकर (भादवण 88..66), सार्थक मोहिते (नेहरू विद्यामंदिर), पायल चव्हाण (चंदगड 86.66), रूद्रकेश पाटील (शिवाजीराव खोराटे विद्यालय 86), आदिती केर्लेकर (माध्यमिक विद्यालय 85.33).

शहरी विभाग
आर्या कामिरे (डीकेटीई हायस्कूल 94.66), साई पाटील (जयसिंगपूर 92.66), रूजुल कानुजे (डीकेटीई हायस्कूल 92), अदविता कोगनोळे (इचलकरंजी 91.27), ध्रुव बाहेती (इचलकरंजी 89.93), अक्षरा पाटील (88.66), जान्हवी देसाई (आदर्श प्रशाला 88), वेदांत जाधव (कोल्हापूर शहर 88).

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks