सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान कागल विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार : राजे समरजितसिंह घाटगे
प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या अभियान अंतर्गत कागल विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात येणार आहे. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कागल विधानसभा मतदारसंघातील मुरगूड, कागल, गडहिंग्लज अशा तीन शहरांसह जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय एक याप्रमाणे सात अशा एकुण दहा ठिकाणी हे शिबिर घेण्यात येणार आहे. त्याची मतदारसंघनिहाय माहिती खालील प्रमाणे
मुरगूड, कागल, गडहिंग्लज,कसबा सांगाव जिल्हा परिषद,सिद्धनेर्ली जिल्हा परिषद,बोरवडे जिल्हा परिषद,चिखली जिल्हा परिषद,कापशी जिल्हा परिषद,उत्तूर जिल्हा परिषद,कडगाव-कौलगे जिल्हा परिषद
या उपक्रमातील पहिला कॅम्प उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात दि. २२/०६/२०२३ रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या दरम्यान उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होईल.
दुसरा कॅम्प गडहिंग्लज शहरामध्ये ३०/०६/२०२३ रोजी सकाळी ११ ते ३.०० या वेळेत बचत भवन गडहिंग्लज येथे होईल.
या अभियानवेळी ईडब्ल्यूएस डोमीसीएल, उत्पन्नाचा, नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला असे विविध दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच रेशन कार्ड वरील नाव कमी जास्त करणे, संजय गांधी निराधार योजना ज्येष्ठ नागरिक एसटी पास, आधार कार्ड अपडेट याही योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. या कॅमच्या ठिकाणी जिल्हा समाज कल्याण, पंचायत समिती कृषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, एम एस ई बी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. असे आवाहनही श्री घाटगे यांनी केले.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे संचालक युवराज पाटील बॉबी माने सुनील मगदूम सचिन मगदूम संजय नरके राजे बँकेचे चेअरमन एमपी पाटील व्हा चेअरमन नंदकुमार माळकर संचालक राजेंद्र जाधव प्रकाश पाटील आप्पासो भोसले डोंगरी विकास समितीच्या सदस्या विजया निंबाळकर सुधा कदम आदी उपस्थित होते.