ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : शिवराज विद्यालयाच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या ३ खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवराज विद्यालय (ज्युनि)कॉलेजच्या कु. जान्हवी संतोष भारमल ( ३३ किलो ) , कु.विभा भरत पाटील (३७ किलो ) व कु.वरद रघुनाथ चौगले ( ३५ किलो ) यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा बॉक्सिंग संघात निवड झाली आहे .
या खेळाडूंना प्रशिक्षक ओंकार सुतार , अतिश आरडे व एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्थेचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक , अॅड वीरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापूरे,कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी.डी .माने यांचे प्रोत्साहन मिळाले .