मंत्री हसन मुश्रीफ यांचा केडीसीसी बँकेत सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्कार झाला. बँकेचे अध्यक्ष असलेले श्री. मुश्रीफ यांचा सत्कार संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये ज्येष्ठ संचालक आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला.
दरम्यान मंत्री श्री. मुश्रीफ यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. पेढ्यांचा हार अर्पण करून प्रभारी मुख्य कार्यकारी गोरख शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी व दिलीप लोखंडे आदी संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.