हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या अधिक माहिती

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून मिळत आहे.आजच कोल्हापूर जिल्हात दुसरी घटना घडली.त्यामुळे सायबर क्राइम यंत्रणाशी संपर्क साधून तक्रारी दाखल करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं; पण आता सोशल मीडियावरून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.हनी ट्रॅप म्हणजे सुंदर मुलीचे आमिष दाखवून जाळ्यात फसवणे आणि आर्थिक लुबाडणूक करणे.
देशात हनी ट्रॅप गँगने आतापर्यंत महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार इत्यादींना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवलंय.
सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरून ब्लॅकमेलिंग केलं.
या सगळ्यांचे पुरावे गँगमधल्या लोकांच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून मिळालेत. आता हे हनी ट्रॅप म्हणजे नेमकं आहे काय? ब्लॅकमेलिंग की सेक्स स्कँडल? मुलींना फसवून जबरदस्ती करणं? असे प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतील. तर सोप्या शब्दांत सांगायचं, तर हनी ट्रॅप म्हणजे एखाद्याला खोटं खोटं प्रेमाच्या जाळ्यात ओढणं.
त्याच्याशी भावनिक आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून समोरच्याची सगळी गोपनीय माहिती मिळवणं आणि ही माहिती दुसर्याला देणं किंवा स्वत:च्या कामासाठी फायदा करणं किंवा समोरच्याला ब्लॅकमेल करणं इत्यादीसाठी वापरली जाते.
राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप गँगचं काम चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो.