ताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाते वाटपाचा तिढा सुटेना ,खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता , अमित शाह यांची मध्यस्थी

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी खाते वाटपाचा तिढा सुटलेलाच नाहीये. त्यामुळे हे मंत्री बिनखात्याचाच कारभार हाकत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून महायुतीत खाते वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होतोय. पण तिढा काही सुटता सुटत नाहीये. त्यामुळे आता तेट हा प्रश्न दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात हा प्रश्न मांडला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत विस्तार करता येणार नाहीये. खाते वाटपावरच मंत्र्यांची संख्या ठरणार आहे. खाते वाटपानंतर किती मंत्र्यांना शपथ द्यायची आणि त्यांना कोणती खाती द्यायची हे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही लटकला आहे. खाते वाटपाचा तिडा सुटत नसल्याने हा प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks