ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखू , धूम्रपानावर बंदी ; धूम्रपान केल्यास २०० रूपयांचा दंड

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाणे, तसेच धूम्रपान करणे यावर बंदी आहेच. आता शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाच्या जागा, उपाहारगृहे, शाळा व महाविद्यालये या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ खाणे, थुंकणे, धूम्रपान केल्यास २०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा तसेच कोटपा कायदयाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक ३० सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून राज्य सरकारने हा जीआर जारी केला आहे.

भारतामध्ये दरवर्षी ८ ते ९ लाख मृत्यू हे तंबाखू सेवनामुळे होत असतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याने तसेच थुंकण्याने विविध आजारांचा फैलाव होत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे तसेच धूम्रपान करण्यास बंदी आहेच. पण आता या ठिकाणी ही उत्पादने वापरल्यास २०० रूपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.

शासकीय कार्यालये व परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी इतरही उपाययोजना करण्यात येणार आहेत. शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यासंबंधीची सर्व माहिती देणारा फलक देखील लावण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks