ताज्या बातम्यामहाराष्ट्र
हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणी कडून शेणगाव येथे पूरग्रस्त कुटुंबाना चादर वाटप

गारगोटी प्रतिनिधी :
शेणगांव (ता. भुदरगड) येथे महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना महापुराचा मोठा फटका बसला. काही कुटुंबाचे दैनंदिन वापरातील संसारिक साहित्य पुरामध्ये वाहून गेले आहे तर काही घरांच्या पडझडीमुळे आहे त्या ठिकाणी गडप झाले आहे. अशावेळी भुदरगड तालुक्यातील शेणगांव या ठिकाणी विविध भागातून विविध संस्था, समूह व व्यक्तिगत स्तरावरून मदत पोहोचवली जात आहे.
हुतात्मा स्वामी वारके सूत गिरणी कडून जवळपास 40 कुटुंबांना चादरीचे वाटप शेणगांव याठिकाणी सभासदांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेणगांव चे माजी सरपंच एन. डी. कुंभार, राजाराम कुंभार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणपतराव जाधव, भुदरगड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस सुभाष कुंभार, मानसिंग तोरसे, महावीर बोरगावे, किरण कुंभार, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.