बेळगांव : मंडोळी गावातील सर्वजण गुण्यागोविंदाने नांदू दे : अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये

मंडोळी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
मंडोळी ता.जि. बेळगाव येथील मंदिराचा जीर्णोद्धार आपण सर्वजण करीत आहात. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असू दे.गाववरची संकटे जाऊ दे.अहंकार निघून जाऊ दे.सर्वजण गुण्यागोविंदाने नांदू देत असे मत माहेरची साडी फेम मराठी अभिनेत्री सौ अलका कुबलब-आठल्ये यांनी मंडोळी येथील मारुती मंदिर,कलमेश्वर मंदिर,विठ्ठल रखुमाई मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारा प्रित्यर्थ मंडोळी गावच्या माहेरवासींनीच्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सुवर्णा होसकोटी अध्यक्षा ग्रामपंचायत मंडोळी या होत्या.
पुढे बोलताना अलका कुबल म्हणाल्या की,या ठिकाणी सर्व महिला सजून आल्या असून आज या ठिकाणी एक मोठा उत्सव असल्यासारखे मला वाटते आहे असे सांगून घरातूनच संस्कार चांगले व्हायला हवेत मुली या वंशाच्या पणत्या आहेत असे सांगितले सासू सुनांनी एक मेकींना पाठिंबा दिला पाहिजे असे सांगितले.
जेणेकरून जगभरात आपले नाव झाले पाहिजेत असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित महिलांना केले.यानंतर त्यांना कमिटी च्या वतीने माहेरची साडी,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवर महिला व माहेरवासीनिंचा हळदी कुंकू समारंभ पार पडला .
यावेळी त्यांना माहेरची साडी असा आहेर देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी साहित्यिक व पत्रकार विजयकुमार दळवी यांनी मनोगतात अल्काताई पडद्यावर जशा दिसतात तशाच वास्तवात दिसतात असे सांगून त्या माणूसपण जपणाऱ्या आहेत असे सांगितले.
त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला असून सलग 3 वर्ष राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्या एक आगळ वेगळं व्यक्तिमत्त्व आहेत असे सांगितले. ईथुनपुढे तुम्ही बोली भाषा कायम बोला ही भाषा चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे असे सांगितले.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील,समाजसेविका स्वाती चौगुले, डॉ.सोनाली सरनोबत, सरस्वती आर पाटील माजी जी. प.सदस्या, प्रा डॉ मधुरा गुरव, कमल मनोळकर, माजी ता. पं.सदस्या आंबेवाडी,श्रीमती गायत्री पाटील अध्यक्ष उचगाव ब्लॉक काँग्रेस, माधुरी नेवगेरी अखिल भारतीय जिल्हा महिला परिषद कर्नाटक अध्यक्षा आदी मान्यवर महिलांनी यावेळी मनोगते व्यक्त करून सर्वांनी मंदिर पुर्णत्वासाठी सहकार्य करावे असे सांगीतले.
यावेळी मान्यवर महिला,माहेरवासींनी,ग्रामस्थ हजर होते महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम संयोजन श्री मारुती मंदिर,श्री कलमेश्वर मंदिर व श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जिर्णोद्धार कमिटी,देवस्की पंच मंडळ व ग्रामस्थ यांनी केले होते.