ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एक सही संतापाची’, राजकीय घडामोडींबाबत राग व्यक्त करण्यासाठी मनसेची राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाक्षरी मोहीम ; राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवराज येडूरे यांच्या नेतृत्त्वात मोहिमेला सुरुवात

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा विरोधात मनसेने आज आंदोलन छेडले आहे. मनसेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे गट अध्यक्ष युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेला मनसेचे नेते, नागरिक, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. त्यांनी स्वाक्षरी करुन या मोहिमेला सुरुवात केली.मुदाळ या ठिकाणी राज ठाकरे यांची राज्यातील राजकारणावरील भाषणे डीजे लावून नागरिकांना ऐकवण्यात आली. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात आले. तर एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. 

सध्या राजकारणात संपूर्ण पक्ष फुटण्याच्या घडामोडी घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आज ८ व ९ जुलै रोजी राज्यभरात स्वाक्षरी मोहीम घेऊन ‘फक्त एक सही, संतापाची’ असे आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली.दरम्यान मनसे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गट अध्यक्ष युवराज येडूरे यांनी सही करत या अभियानात सहभाग नोंदवली आहे. सहभाग घेतल्यावर माध्यमाशी बोललना युवराज येडूरे म्हणाले की, लोकांच्या मनातील राजकीय घडामोडीवरील संताप राजकारण करणाऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान असल्याचे ही युवराज येडूरे म्हणाले.

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपसोबत गेल्यानंतर जनतेकडून तीव्र भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या. ही बाब ताजी असतानाच आता राष्ट्रवादी कांॅग्रेस शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाली. या दोन्ही पक्षात गटाबाजी उफाळली. या राजकीय परिस्थितीबाबत जनतेच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. हे हेरण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया, भावना पक्षासाठी महत्वपूर्ण असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सर्वसामान्यांना संताप व्यक्त करुन देण्यासाठी राधानगरी आजरा भुदरगड विधानसभा मतदारसंघांमध्ये मुदाळ तिठ्ठा येथे मनसेने हा उपक्रम सुरु केला आहे. सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून सर्व राजकारण सुरू आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने ही मोहीम सुरु केली गेली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks