महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झडणारे तसेच राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हूणन ओळखला जातो.याच डॉक्टर दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व बाळा नांदगावकर साहेब यांच्या सूचनेनुसार १ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. कदम, डॉ. कांबळे, डॉ गोजारे, डॉ.सचिन कोरे, डॉ. बेळे, डॉ. देशपांडे,डॉ. शेळके, डॉ. शिकलगार, डॉ. पटवेकर, डॉ.पाटील डॉ.मोमीन,डॉ. देसाई, डॉ. कुभार, डॉ.महात, डॉ.पालकर, डॉ. कडव, डॉ.उदय पाटील, डॉ.चौगले, डॉ चाँद असे अनेक नामवंत डॉक्टर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना डॉक्टर दिनाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी येणाऱ्या अनेक अडचणी आणि भविष्यामध्ये येणारे अडचणी वरती मात करण्यासाठी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली.असे राधानगरी ,आजरा ,भुदरगड गट अध्यक्ष युवराज येडुरे यांनी निकाल न्युजशी बोलताना सांगितले.
यावेळी महाराष्ट्र एनजीओ समिती संपर्कप्रमुख संदीप बोटे,सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम गुरव, अमित कोरे, वृषभ आमते, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल साळुंखे, सौरभ कांबळे, व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.