कागलमधील आपुलकी सेवाभावी संस्थेचे कार्य विधायक : आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून गौरवउद्गार ; तुषार भास्कर यांचे सामाजिक काम गौरवास्पद

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमधील आपुलकी सेवाभावी संस्थेचे विधायक कार्य लोकोपयोगी आहे, असे गौरवोद्गार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले. या संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख तुषार भास्कर यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव रामचंद्र कांबळे होते.
आमदार श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, तुषार भास्कर यांच्यासारखे सेवाभावी कार्यकर्ते हीच आपली खरी संपत्ती आहे. पुढील काळातही या संस्थेने अशीच चांगले काम करावीत. तुषार भास्कर यांनी पुढील काळात समाजकार्य असेच करत रहावे, त्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी हिमालयासारखे त्यांच्या मागे राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, शासनाच्या सर्व योजना सर्व सामान्यांच्या दारापर्यंत आमदार मुश्रीफसाहेबांनी पोचविल्या आहेत. रमाई आवास योजना कागल शहरांमध्ये भरपूर प्रमाणात करण्यात आल्या आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद देतो व असेच कार्य सुरु रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी आपुलकी सेवाभावी संस्था यांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त “माझा समाज: माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत गरजू मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप, झाले. रशिया येथील विद्यापीठामध्ये सारिका सात्ताप्पा कांबळे हिची एमबीबीएससाठी निवड झाल्याबद्दल, अभिषेक अनिल कांबळे यांची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल व अर्पिता नितीन कांबळे एसएससी परीक्षेमध्ये ९६ टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल विशेष सत्कार झाले. दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी तुषार भास्कर, भक्ती चाफेकर, अजित कांबळे यांचीही मनोगत झाली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयाबाबा माने, अजित कांबळे, विवेक लोटे, भगवान कांबळे, ॲड. अभिजित शितोळे, दीपक कांबळे, सुनील कांबळे, बच्चन कांबळे, अनिल भोसले, संस्थेचे अध्यक्ष तुषार भास्कर, खजानिस गजानन पाटील, सचिव दिनकर वेताळे यांच्यासह प्रभागातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.