ताज्या बातम्यामहाराष्ट्र
टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्यासह ३ ठार

टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे ठार आणि एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथे झाला.
हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मृत पोलिस कर्मचारी कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत होता.