मुरगुड : आषाढवारी निमित्त मुलांनी काढली पंढरीची दिंडी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुलांचा सदरा आणि धोतर मुलींच्या नऊ वारी साड्या अशा पारंपरिक वारकरी पेहरावात विठ्ठलाचे भजन म्हणत न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुला मुलींनी पंढरीची दिंडी साकारली.
मुरगूड शहर व परिसरातील खेड्या मधून वारकरी संप्रदायाचा पगडा मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांच्या या दिंडीचे कौतुकही झाले. या संप्रदायातील लहान थोराना माऊली म्हणून संबोधण्यात येते. त्यातून स्नेह भाव व भक्तिभाव व्यक्त होतो.
या संस्कराचे मुलामध्ये जतन व्हावे म्हणून शाळेने दिंडीचे आयोजन केले होते असे अध्यापिका सविता पोवार यांनी सांगितले ,सौ ट्रिझा फर्नांडिस , सौ.गीता जाधव ,,सौ.ग्लोरिया फर्नांडिस ,व शाळेच्या अन्य अध्यापक ,अध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडीला मार्गदर्शन केले.शासकीय अथीती गृह ,पोलिस ठाणे , नगरपरिषेद ,मार्गे दिंडीचा मार्ग होता.गणेश मंदिरासमोर रिंगण सोहळा संपन्न झाला.यावेळी मुरगुडचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे ,पोलीस सतीश वर्णे ,राहुल गायकवाड यांनी दिंडीचे स्वागत केले.