शाहू महाराजांच्या लोकहिताच्या व समाभिमुख राज्यकारभारामध्ये बंधु पिराजिराव घाटगे यांचे महत्वपूर्ण योगदान : सिने अभिनेते राहुल सोलापूरकर ; शाहू जयंतीनिमित्त कागलमध्ये व्याख्यान

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलने कोल्हापूरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने लोक कल्याणकारी राजा दिला. कागल संस्थांनचे जहागीरदार राजर्षींचे धाकटे बंधू पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांचे शाहू महाराजांच्या लोकहिताच्या व समाजभिमुख राज्यकारभारामध्ये महत्वपूर्ण योगदान होते ,असे गौरवदगार सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काढले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त येथील श्री राम मंदिर मधील सभागृहात झालेल्या व्याख्यान वेळी ते बोलत होते.
यावेळी श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगे, सौ नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंहराजे घाटगेसो श्रेयादेवी घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक बॉबी माने,सतीश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.सोलापूरकर पुढे म्हणाले, शाहू महाराज व बापूसाहेब महाराज या राम-लक्ष्मणाच्या जोडीने खांद्याला खांदा लावून कोल्हापूर संस्थांनचा कारभार लोकाभिमुख केला.बहुजन समाजाचे आयुष्य प्रकाशमान करणारे व्यक्तिमत्व शाहू महाराज होते पारतंत्र्याच्या काळातही त्यांनी राबवलेल्या लोक हिताच्या योजनांची स्वातंत्र काळात बहुजन समाज फळे चाकत आहे मात्र समाज व राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास चांगला समाज घडेल समाजाने किमान चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवावी. व समाजभिमुख वर लोकहिताचे विचार पुढे नेणाऱ्या नेतृत्वालाच यापुढे साथ द्यावी.
स्वागतपर मनोगतात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे कार्य व विचार प्रेरणादायी आहेत. आजच्या पिढीला ते समजावेत. त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी.यासाठीच व्याख्यानाचे आयोजन केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कागल विधानसभा मतदार संघात आयोजित केलेल्या जातीच्या दाखल्याच्या कॅम्प मध्ये काढलेल्या 300 हून अधिक दाखल्यांचे वितरण यावेळी श्री सोलापूरकर व श्री.घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला.
छत्रपतींच्या घाटगे जनक घराण्याचा विचारचा वारसा पुढे चालवणाऱ्या राजे समरजीतसिंह यांना साथ द्या .
बहुजन समाजाच्या उद्धाराचा शाहू महाराजांनी पाया घातला. त्यांच्या पश्चातजनक घराण्यातील सर पिरजिराव घाटगे , जयसिंगराव महाराज, स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी आपल्या लोक हिताच्या कारभारातून त्यावर कळस चढवला. तर राजे समरजीतसिंह घाटगे यांनी त्यामध्ये भर घालत या कळसाची झळाळी वाढवली. छत्रपतींच्या जनक घराण्यातील या वारसास कागलकरांनी राजमान्यता द्यावी. त्यांच्या समजकर्यात साथ द्यावी असे आवाहन श्री सोलापूरकर यांनी केले.