ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाहू जयंती साजरी

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शाहूंची माहिती क्रमिक पुस्तकातून फारशी उपलब्ध नाही.इतिहास शिक्षक यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.
विशेषतः विविध समाजाच्या विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे ,शाळेत मुले न धडणाऱ्या पालकांना एक रुपया दंड.अंधश्रध्दा निर्मूलन ,तसेच डॉ.आंबेडकर यांचे समवेत माणगाव परिषद इत्यादी ची माहिती मुलांना देण्यात आली.मुलांनी छत्रपतीं शाहू व छ्त्रपती शिवाजी राजे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.