ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : कुदनूर ते खनेटी रस्त्याची झाली चाळन ; रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा , नागरिकांची मागणी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कुदनूर ते खनेट्टी या रस्त्याची अक्षरशः चाळन झाली असून सुमारे 4 ते 5 किमी अंतर असणाऱ्या या रस्त्यात खड्डे पडले असून या रस्त्यावरून नीट चालताही येत नाही व वाहन पण नीट चालवता येत नाही रस्ता अत्यंत खराब असलेने एस टी बसेस पण बंद झाल्या आहेत खनेटी गावांतील वेशीतील खडीकरण ही उखडले असून सदर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे .