लोककलेतून आपली संस्कृती जपावी – अभिनेत्री अंशूमाला पाटील

बिद्री प्रतिनिधी (अक्षय घोडके)
लोक कलाकरानी आपल्या कलेतून भारतीय संस्कृती जोपसण्यासाठी लोककला जपावी .असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री अंशुमाला पाटील यांनी केले .
आदमापूर ( ता .भुदरगड )येथे सदगुरु बाळूमामा सास्कृतिक हॉल मध्ये ओयोजित केलेल्या लोककलाकार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार अध्यक्ष विलास पाटील हे होते . यावेळी सरस्वती व बाळूमामा फोटोचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. पुढे त्या म्हणाल्या श्री.पाटील हे लोककलाकारांच्या प्रश्नांच्यासाठी गेली अकरा वर्ष धडपडत आहेत. त्यांना तुम्हा सर्वाचे पाठबळ पाहून त्यांना नवी उर्मी येते
यावेळी शाहू महाराज यांची प्रमुख भूमिका केलेले यशवत बेहरे ,शाहिर सदाशिव निकम , रविद्र कामत ., शामराव खडके, जनार्दन पाखरे हे प्रमुख उपस्थीत होते .यावेळी तालूक्यातील पदाधिकारी ओळखपत्र व नियुक्त पत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास आनंदा बारड , संतराम पाटील , अनिता मगदूम , पाडुरंग आवळकर , राजाराम कोपटकर ,रघुनाथ कांबळे . रघुनाथ पाटील ,. प्रसाद माळवी . अशोक कुभार . मारूती पाटील सज्जना पाटील उपस्थित होते..रामचद्र चौगले यांनी स्वागत केले.. विश्वास आरडे यांनी सुत्रसंचालन केले.. तर पांडुरंग आवळकर यांनी आभार मानले.