ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दापोलीत मॅक्झिमो-ट्रेलरची जोरदार धडक ; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, सातजण जखमी

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली (Dapoli) तालुक्यातील हर्णे मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात धडक झाली. या घटनेत बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

चालक अनिल सारंग (वय 45, हर्णै), संदेश कदम (वय 55), स्वरा संदेश कदम (वय 8), मारियम काझी (वय 64), फराह काझी (वय 27, सर्व अडखळ), मीरा महेश बोरकर (वय 22, रा. पाडले), वंदना चोगले (वय 34, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

सपना संदेश कदम (वय 34, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (वय 14, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (वय 17), मुग्धा सावंत (वय 14), ज्योती चोगले (वय 9, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी बागेजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बांधकाम साहित्य रिकामे करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी समोरुन मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी वडाप गाडीत 14 प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ता राहिला नाही. याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला.

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमींना उपचारांसाठी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार करुन काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्याची माहिती आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks