कागल : शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बहूजन समाज उद्धारक, लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती कारखान्याच्या कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी केली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे पूजन संपन्न झाले. यावेळी युवराज आर्याविर घाटगे यांची उपस्थिती होती.
यावेळी कारखाना प्रधान कार्यालयातील कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेचे व कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक संजय नरके, शिवाजीराव पाटील , राजू पाटील यांनी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत माने , युवराज पाटील, डॉ डी एस पाटील , भाऊसाहेब कांबळे, सचिन मगदूम संचालिका सौ.सुजाता तोरस्कर,सौ, रेखा पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आदींसह शाहू ग्रूपमधील विविध संस्थाचे पदाधिकारी,कागल नगरपरिषदेचे नगरसेवक, शाहू प्रेमी, कारखान्याचे सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी व शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला .