धक्कादायक : ट्रॅक्टरची ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिला ठार

शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली मधून घरी परतत असताना कारंडवाडी येथे कनेर उजव्या कालव्यात ट्रॉली कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू झाला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कारंडवाडी गाव आहे या गावातील सात ते आठ महिला शनिवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी जायला निघाल्या कारंडवाडी देगाव रस्त्यावरील कॅनल शेजारी ट्रॅक्टर येत असताना वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉल मध्ये कोसळली त्यामुळे वरील चार महिलांचा कॅनॉल मधील पाण्यात बुडून मृत्यू झाला दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनॉल मधून बाहेर काढले यामुळे त्यांचा जीव वाचला परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकच गावातील चार महिला बुडाल्याचे समजताच कारंड वाडीतील नागरिक महिला तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पोलिस व नागरिकांनी चारीजनांचे मृतदेह कॅनॉल मधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठवले अधिक तपास पोलीस करत आहेत.