ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात २६ ते २९ जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई, पुणेसह अवघा महाराष्ट्र काबीज करीत मान्सूनने अवघ्या २४ तासांत ९० टक्के देश व्यापला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाची लहर पसरली आहे. २६ ते २९ जून दरम्यान राज्यात सर्वत्र मुसळधारेचा इशारा दिला असून कोकणला २६ व २७ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सून २३ जून रोजी बंगालच्या उपसागरातून थेट विदर्भात दाखल झाला. २४ जुनला त्याने ६० टक्के देश व्यापला होता. रविवारी २५ जुनला अवघ्या २४ तासांत त्याने प्रचंड वेगाने मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यासह ९० टक्के देश व्यापला आहे. मान्सूनचा हा वेग आर्श्चकारक असून आजवर फार कमी वेळा त्याने इतक्या वेगाने देश व्यापला आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी सांगितले की, मान्सूनने रविवारी मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्य व्यापले आहे. अवघ्या २४ तासांत ९० टक्के देशही व्यापून टाकला आहे. पश्चिमी वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने हे शक्य झाले. २६ ते २९ जुनपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. २९ जून ते १ जुलै पर्यंत मात्र पावसाचा वेग काही भागात मंदावेल व त्यानंतर तो पुन्हा वेग घेईल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks