ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड मध्ये मराठा आरक्षण समर्थनात बेमुदत साखळी उपोषण सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड ता.कागल येथे मराठा आरक्षण समर्थनात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थासमोर बेमुदत साखळी उपोषणास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवत अंबाबाईचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे घोषणा देत उपोषणस्थळी येवून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अथवा त्यावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. पहिल्या दिवशी संतोष भोसले, मयूर सावर्डेकर, ओंकार पोतदार, सर्जेराव भाट, अभिजीत मिटके, विशाल मंडलिक, रणजित मोरबाळे, अजित मेंडके यांनी उपोषणास प्रारंभ केला.

यावेळी दत्ता मंडलिक, राजेखान जमादार, महादेव सुतार, चंद्रकांत जाधव, मारुती चौगले, अॅड. सुधीर सावर्डेकर, नामदेव मेंडके, एकनाथ देखमुख ,बजरंग सोनुले,सोमनाथ एरनाळकर ,जगन्नाथ पुजारी ,तानाजी गोधडे, मारुती कांबळे,संजय घोडके ,नलिनी सोनाळे, धनाजी पाटील, सुखदेव येरुडकर, रणजित सुर्यवंशी, दगडू शेणवी,हाजी बाळासाहेब मकानदार,रंगराव चौगले यांची भाषणे झाली. ओबीसी, धनगर, मातंग, मुस्लिम समाज तसेच शिवसेना, मळगे बु ग्रामपंचायत आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks