ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला मनसे चा पाठींबा

कागल :

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे याकरिता एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे.यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष नागेश चौगुले व कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ व इतर पदधिकारी महाराष्ट्र सैनिक यांनी कागल आगार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट देत त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या” व जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी न झाल्यास सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला. यावेळी मनसे पदाधिकारी मनसे सैनिक व सर्वं विभागाचे एस टी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks