विद्यार्थ्यांनी लेखन साहित्याशी एकरूप व्हावे : सागर पाटील

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विद्यार्थ्यानी लेखन साहित्याशी एकरूप व्हावे, मानवी जीवन आणि निसर्ग यांचे निरीक्षण करून लेखन साहित्य भर घालावी. असे मत नवोदित कमी कवी सागर पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो.जाधव महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील म्हणाले की ,विद्यार्थ्यांच्या सुप्त लेखन गुणांना वाव मिळावा, त्यांना लेखन कार्यासाठी प्रोत्साहित करावे यासाठी हा कार्यक्रम यशस्वी झाला.
सदर काव्य वाचनात नवकवी सागर पाटील यांनी स्वयं रचित “हे महात्म्यांनो” या कविता संग्रहातील कवितांचे वाचन केले. तसेच प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील , डॉ. संदीप पानारी, प्रा. आदिनाथ कांबळे, प्रा. वंदना पाटील, सायमा महालदार, सानिका कदम आदींनी कविता वाचनात सहभाग नोंदवला .
यावेळी जीवन की परिभाषा है हिंदी, आई, स्वतःसाठी थोडं जगणा रे ,मेरे मन के पीछे तुम हो ,रानवेल, प्रतिबिंब, चांदणे ,काळोख, प्रतिबिंब आधी विविध भावस्पर्शी कविता सादर करण्यात आल्या.याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पाहुण्यांची ओळख प्रा. ऐश्वर्या धामोडकर यांनी करून दिली. सदर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई, संस्था सचिव प्रा.डॉ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी पारगावकर ,स्वागत व प्रास्ताविक प्रा.अरुण गावकर तर आभार प्रा हुसेन फरास यांनी मांनले .यावेळी प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.