शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता करण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये रविवार आणि बुधवार रोजी 4 तास स्वच्छतेसाठी वेळ देत या तरुणांनी संपूर्ण मंदिर स्वच्छ करून मुरगूड अग्निशामक दलाच्या बंबामार्फत संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढले.
यावेळी संपूर्ण ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासह लक्ष्मी मंदिर, सूर्यापकाका, मरगूबाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता तरुणांनी केली. या स्वच्छता मोहिमेत मुरगूड शहरातील युवकांचा उस्फुर्त सहभाग होता. हातामध्ये झाडू, खराटा स्वच्छतेचे साहित्य घेत युवकांनी सकाळी सहा वाजलेपासून मंदिरांच्या स्वच्छतेस प्रारंभ केला.
पहिल्या दिवशी संपूर्ण मंदिर झाडून घेत परिसराची ही स्वच्छता करण्यात आली तर बुधवारी संपूर्ण मंदिर मुरगुड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाद्वारे धुऊन काढण्यात आले. सकाळी 9 वाजता संपूर्ण मंदिराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली. मंदिराचा सभागृह हॉल गाभाऱ्यासह शिखराची स्वच्छता यावेळी युवकांनी केली.
मुरगूडच्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिरामध्ये माहेरवाशिणीसह कोल्हापूर जिल्हासह बाहेरच्या जिल्ह्यातून भाविकभक्त नवरात्र काळामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. मुरगूड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रमध्ये हे नवीन दगडी बांधकाम शैलीमध्ये बांधण्यात आलेले मंदिर आकर्षक ठरत आहे. आदमापुर अमावस्या यात्रेसाठी आलेले भावीक देखील या मंदिरास भेट देऊन दर्शन घेत आहेत.
या स्वच्छता मोहिमेस शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, सोमनाथ यरनाळकर, ओंकार पोतदार, संकेत शहा, प्रकाश पारिषवाड, तानाजी भराडे, अमोल मेटकर, विनायक मेटकर, प्रणित कुन्नूर,सागर शहा, प्रफुल्ल कांबळे ,अक्षय पोतदार, धोंडीराम परीट,धनंजय सूर्यवंशी, प्रशांत करडे,शिवाजी चौगले, अमर लोहार,आनंदा रामाने, चेतन गवाणकर, अमित दरेकर,नामदेव भराडे, रघुनाथ बोडके, आनंदा मोरे, सचिन गुरव जगदीश गुरव यांच्यासह अंबाबाई सेवेकरी व भक्त युवक वर्ग उपस्थित होता.