विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे : स्मिता सुधीर ; मंडलिक महाविद्यालयात चमत्कारा मागील विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील सदाशिव मंडलिक महाविद्यालयातील विवेक वाहिनी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यातील सामाजिक करारा अंतर्गत (MOU) चमत्कारा मागील विज्ञान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मिता सुधीर होत्या त्यांचे सहकारी भीमराव कांबळे देखील उपस्थित होते.
सुरुवातीस अंनिस चे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विवेक वाहिनीचे प्रमुख व इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ. पी. आर. फराकटे यांनी केले अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या स्मिता सुधीर यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील तफावत दाखवून देत विविध प्रात्यक्षिकेतून ढोंगी बाबा ढोंगी साधू लोग सर्वसामान्य लोकांची कशी फसवणूक आर्थिक लोबाडणूक करतात हे स्पष्ट करून सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजामध्ये वावरत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून वावरले पाहिजे. फसवणुकीला बळी पडता कामा नये असे सांगितले. अध्यक्ष मनोगतात डॉक्टर होडगे यांनी विवेकी विचाराबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी पवार, प्रा. अद्विक जोशी, प्रा.सौ.माणिक पाटील, प्रा. विनोद प्रधान प्रा.गोरूले, प्रा सामंत, प्रा सौ कुंभार प्रा गोरे ,प्रा.सारंग, प्रा.हेरवाडे, प्रा. मेंडके, प्रा.खतकर, प्रा. सुखदेव एकल, प्रा.राजेंद्र पाटील, प्रा राम पाटील प्रा कुदळे प्रा कांबळे प्रा.मोरे, प्रा.भामरे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सौ.अर्चना कांबळे तर आभार प्रा.स्नेहा हवलदार यांनी मानले.