देवचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिले मुरगुड विद्यार्थी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा धडे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देवचंद कॉलेज अर्जुननगर येथील संगणकशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी क्विक हील मार्फत असणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियाना अंतर्गत आज मुरगूड विद्यालय मुरगूड येथे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले.
यावेळी वॉरियर्स आलोक कांबळे, श्रावणी पवार, वेदिका घाटगे, हर्षदा पाटील, प्राजक्ता खवरे या विद्यार्थ्यांनी सुंदर अश्या पद्धतीने 1189 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी नक्की सायबर क्राइम म्हणजे काय हे समजवून दिलं , आपला पासवर्ड कसा ठेवायचा आणि आत्तापर्य झालेल्या सायबर गुन्ह्यांना एका गोष्टींमार्फत त्यांना समजावून सांगितले आणि त्यापासून कसे सुरक्षित रहावे आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा कसे सुरक्षित ठेवावे हे सुंदर पद्धतीने आणि त्यांना समजेल असे त्यांच्या भाषेमध्ये सांगितले.
यावेळी शाळेचे प्राचार्य एस.पी.पाटील म्हणाले देवचंद महाविद्यालच्या वतीने आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यांचा एकच उद्देश आहे की आजच्या डिजिटल युगात संगणक आणि इंटरनेटचा योग्य वापर हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. परंतु त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे हे तितकेच गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजेत व कोणत्याही अज्ञात दुव्यावर क्लिक करू नये. स्वतःची वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा फोटो सहजासहजी शेअर करू नयेत. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून जबाबदार नागरिकत्वाची पायरी आहे. यामधूनच सुजाण, सुरक्षित व डिजिटल साक्षर विद्यार्थी घडतील, हीच अपेक्षा आहे.
या सर्व उपक्रमाची सांगता प्राचार्य श्री एस.पी.पाटील यांनी उपस्थित वॉरियर्सचां सत्कार करून केली. वॉरियर्सना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.