मुरगूड येथे इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या सभागृहात मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी इंजिनियर्स असोसिएशनच्या सदस्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले . यावेळी मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष सागर भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले .
यावेळी अभियंता दिना निमित्त माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , माजी नगरसेवक शिवाजी चौगले यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी नगरपरिषदेचे नगर अभियंता प्रदीप देसाई , लेखा परीक्षक अंजली हजारे , अकौंटंट मनाली शिंदे , अस्थापना प्रमुख सुरेखा वडर , पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहित अतवाडकर ,जयवंत गोधडे ,रणजीत निंबाळकर , अनंत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिंदे ,प्रकाश पोतदार , बाळासाहेब सुर्यवंशी ,
मयुर आंगज , आकाश दरेकर यांच्यासह दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी स्वागत आकाश आमते यांनी केले .प्रास्ताविक अध्यक्ष सागर भोसले यांनी केले . सूत्रसंचालन महादेव कानकेकर यांनी केले .तर आभार पुरुषोत्तम देसाई यांनी मानले .