आदमापूर : बाळूमामा भक्तांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध ; वाहनतळ, अन्नछत्र, स्वच्छतागृह उभारणीसाठी प्राधान्य

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा देवस्थानला दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. अनेक समस्यांचा सामना भाविकांना करावा लागत आहे. भाविकांना बाळूमामां च दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन रांगेत मध्ये सुधारणा, वाहन पार्किंग करण्यासाठी वाहनतळ, सर्व सोयीनियुक्त अन्नछत्र, सुलभशौचालय उभारणीचे काम त्वरित सुरू केले जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र कर्नाटकात बाळूमामां ची बकरी फिरत आहेत. जशी बकरी पुढे जातील तसा बाळूमामांचा भक्तगण वाढत आहे. वाढत्या भक्तगणां च्या सेवा सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समिती कार्यरत आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त वाहनतळ, सुलभ शौचालय उभा करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
बाळूमामा अंधश्रद्धेच्या विरोधी होते. त्यामुळे बाळूमामां च्या नावाचा वापर करून काहीजण समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत. अशा लोकांच्या पासून सावध राहा. बाळूमामाचे वंशज म्हणून कोणी जर तुमच्यासमोर येत असेल तर त्याचा स्वीकार करू नका त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. आज पर्यंत अन्नछत्र, दर्शन मंडप, मार्बल मंदिर, भक्तनिवास वाहनतळ, मंदिर परिसर फरशी बसवणे अशी कामे झाली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे अल्प दरात रुग्ण सेवा सुरू केली आहे. भक्तांचा गोतावळा वाढत असल्यामुळे सेवा सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत.
बाळूमामा मंदिर समितीचा कारभार सर्व विश्वस्ताना विश्वासात घेऊन सुरू आहे काहीही चुकीचे होत नाही पण सोशल मीडियातून चुकीची माहिती भक्ता समोर जाऊन भक्ता मध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, इंद्रजीत निंबाळकर, बसवराज देसाई, विनायक शिंदे, संदीप मगदूम, रामांणा मरेगुदरी, तमन्ना मासरेडी, पुंडलिक होसमणी भिकाजी शिंगारे आदी उपस्थित होते. सरपंच विजय गुरव यांनी आभार मानले.