स्मार्ट मीटर सक्तीविरोधात अवचितवाडी ग्रामस्थांचे निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवत असल्याच्या निषेधार्थ अवचितवाडीतील ग्रामस्थ व युवकांनी आज मुरगूड वीज वितरण कंपनीचे अधिकारी सुरेश कोकणे यांना घेराव घालून जाब विचारला.आणी स्मार्ट मीटर च्या विरोधात निवेदन देण्यात आले..
स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी आणि परवानगीशिवाय बसवलेले मीटर त्वरित काढून टाकावेत,अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
अवचितवाडीतील जुनी लाईट मीटर मुद्दामहून नादुरुस्त ठरवून ग्राहकांना स्मार्ट मीटर सक्तीने लावण्यात येवू नयेत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भुर्दंड लादू नये, अशी मागणीही यावेळी संभाजी गायकवाड यांनी केली..
यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा युवराज सुतार यांनी दिला.तसेच परवानगीशिवाय बसवलेले सर्व मीटर त्वरित काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी केली.
महावितरण अधिकारी सुरेश कोकणे यांनी ग्राहकांची बाजू ऐकून घेतली, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.“आम्ही कोणालाही जबरदस्ती केलेली नाही, त्यानी सांगण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सरपंच संभाजी गायकवाड, संतोष कारंडे माजी ग्रा.पं.सदस्य शिवाजी भारमल युवराज सुतार,अशोक गायकवाड,ग्रा.पं.सदस्य सचिन भारमल, संभाजी पाटील यांच्यासह अनेक संतप्त ग्राहक उपस्थित होते.
स्मार्ट मिटर ग्राहकांच्या माथी मारता येणार नाही. कायद्याने सक्ती करता येणार नाही. अशा प्रकारच्या अनेक मागण्या करण्यात आल्या. खाजगी कंपनीच्या भल्यासाठी नको तर ग्राहकांच्या भल्यासाठी काम करा असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी संदिप बोटे म्हणाले, ग्राहकांनी स्मार्ट मिटरच्या भानगडीत पडू नये, विरोध केल्यानंतर सक्ती करता येणार नाही. त्यामुळे पुढील भरमसाठ बीले येण्यापूर्वी जागृत होवून ग्राहकांनी स्मार्ट मिटर ला विरोध केला पाहिजे.रोध केला पाहिजे.