ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड नागरी सहकारी पत संस्थच्या लिंगनूर शाखेचा शुभारंभ ; पहिल्या दिवशी ३१ लाखाच्या ठेवी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड नागरी सहकारी पत संस्था मुरगूड या संस्थेच्या लिंगनूर (ता. कागल) येथील शाखेचा शानदार शुभारंभ झाला. पहिल्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी ३१ लाख ठेवी संकलन झाले.
मुरगूड येथे अवघ्या सहा महिन्यापुर्वी स्थापना झालेली मुरगूड नागरी पतसंस्था कालावधीतच नावारूपाला आली व सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. शाखेचे उदघाटन हाजी. बाळासाहेब बाबालालशेठ मकानदार यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच स्वप्नील कांबळे होते.
यावेळी मयूर आवळेकर, नानासो घाटगे, जोती चव्हाण, संस्थापक चेअरमन जावेद बाळासाहेब मकानदार प्रमुख उपस्थितीत होते. स्वागत सचिन मिसाळ यांनी तर प्रास्ताविक अजितकुमार कापसे यांनी केले. तर आभार बाळासाहेब मकानदार यांनी मानले.