इचलकरंजी जलतरण स्पर्धेत कौलवकर हायस्कूलचे सांघिक रिले संघ द्वितीय

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
कौलव(ता राधानगरी)येथील बाळासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेच्या सांघिक जलतरण रिले संघांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावले.शाळेच्या वॉटर पोलो संघालाही प्रथम क्रमांक मिळाला.
इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कौलवकर हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.सिद्धार्थ सागर पाटील याने १०० मी बटर फ्लाय द्वितीय ,४०० मी फ्री स्टाईल प्रथम ,विरेन अरविंद चौगले याने १०० मी ,२०० मी बॅक स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.तर वरिष्ठ गटात शाळेच्या सांघिक रिले संघांनी फ्री स्टाईल आणि मिडले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
वॉटर पोलो संघालाही प्रथम क्रमांक मिळाला.शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांची निवड सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ जाधव,माजी मुख्याध्यापक ए व्ही चरापले ,कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित पाटील ,मानद सचिव अनिरुद्ध पाटील कौलवकर यांचे लाभले.