ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमगांव येथील वागेश्वरी मठात श्रावण महिन्यानिमित्त शिवभक्तांकडून स्वच्छता मोहीम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

चिमगाव ता.कागल येथील वागेश्वरी मठ तथा चिमाबाई मंदिर येथे श्रावण महिन्या निमित्त शिवभक्तांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी असते. त्यानिमित्त श्रावण महिना सुरू होण्याआधी मंदिर व परिसराची स्वच्छता शिवभक्त यांचेकडून करण्यात आली.

परिसरातील भाविक भक्तांच्या कडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान सुरू होते. मुरगूड येथील शिवभक्त व स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले. मंदिर परिसर मार्गावरील अनावश्यक झाडे झुडूपे वाढली होती . ती सर्व काढून टाकण्यात आली व भाविकांसाठी स्वच्छ प्रांगण तयार करण्यात आले. शिवाय ठीकठिकाणी पडलेल्या प्लॅस्टिक बाटल्या, रबर टायर्स इत्यादी कचऱ्याची शिवभक्तांनी विल्हेवाट लावली.

या स्वच्छता मोहिमेत शिवभक्त स्वयंसेवक सर्जेराव भाट, तानाजी भराडे, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, अमोल मेटकर, प्रफुल कांबळे, जगदीश गुरव यांचेसह वागेश्वरी मठाचे पुजारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks