चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरीत यशस्वी ग्रामीण महिला संघ अंतर्गत समता गाव विकास समिती वडणगे यांच्या वतीने शालेय मुलांना वह्या आणि खाऊ वाटप

कौलव प्रतिनिधी /संदीप कलिकते
चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे प्रेरीत यशस्वी ग्रामीण महिला संघ अंतर्गत समता गाव विकास समिती वडणगे यांच्या वतीने विद्या मंदिर वडणगे येथील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व महिलांचे केंद्र प्रमुख शंकर पाटील सर यांनी स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त करताना चैतन्य संस्थेचे कार्य आदर्शवत असुन, त्यांच्या अंतर्गत असणार्या यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर ने महिलांना व्यासपीठ निर्माण करून उद्योग व्यवसाय करणेकरीता आर्थिक सहाय्य दिल्याने कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळवून दिला आहे येथील समता गाव विकास समिती मधील बचत गटाच्या महिलांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे म्हणून त्यांचे कौतुक केले.
तसेच यशस्वी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांनी चैतन्य संस्थेचचीआणि यशस्वी संघाची ओळख आणि कामाचे स्वरूप सांगितले यावेळी कार्यकर्त्यां शितल कुसाळे,संघ पदाधिकारी संजीवनी गुरव, समिती अध्यक्षा राजश्री नांगरे, सचिव गीता मिरजे, खजिनदार प्रतिमा होनखांबे, पुजा नांगरे,साक्षी साळोखे,रोशन काटे,निशाताई डेंगरे यांच्या सह गावविकास समिती सदस्या, बचत गटातील महिलासह शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार मुख्याध्यापक दिपक चोपडे सर यांनी मानले.