ताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवा पैलवान पवनकुमार पाटील याने आपल्या वाढदिवसाची रक्कम मयत तरूणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी दिली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आदमापूर चा युवा पैलवान, कुस्तीपट्टू कु.पवनराज विकास पाटील यांने गेल्या अनेक महिन्यात जिंकलेल्या कुस्तींची सारी रक्कम, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आदमापूर येथील एका मयत तरूणाच्या विधवेला देवून आजच्या तरूण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.मुलाच्या शिक्षणासाठी ही रक्कम कामी येणार आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव व त्यांचे सहकारी सदस्य यांच्या उपस्थितीत पवनकुमार पाटीलने यांच्या कडे सुपुर्द केली.आदमापूर व परिसरात या मुलाच्या सत्कार्याची चर्चा सुरू आहे.पवनकुमार हा मुदाळच्या प. बा.पाटील विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे.

पवनचे वडील विकास पाटील एक प्रतिष्ठित उद्योजक असून उत्तम प्रकारचे समाजसेवक आहेत.तर आजोबा कुंडलिक ज्ञानू पाटील हे सद्गुरू बाळूमामांचे भक्त म्हणून ओळखले जातात.मल्ल पवनकुमार याने शालेय जीवनात अनेक कुस्त्या जिंकून अनेक विक्रम स्थापित केले आहेत.काही यात्रांचे आखाडे जिंकले आहेत यातून त्याला बऱ्यापैकी रक्कम मिळाली होती.

गारगोटी, कुरणी, म्हसवे, सावर्डे, कोनवडे, सरवडे, राशिवडे ,घोडेश्वर कुरुकली अशा अनेक ठिकाणची मैदान त्याने कुस्ती जिंकून गाजवली आहेत.ही सर्व रक्कम त्याने या मयत तरूणाच्या मुलाच्या शिक्षणाकरिता दिली.त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

गेल्या वर्षीही त्याने आपल्या या मानधनाची रक्कम आदमापूर गावच्या विद्या मंदिर आदमापूर बांधकासाठी दिली होती.सद्गुगुरु बाळूमामांचे या या गावी मामांच्या संस्कार व विचाराचा प्रभाव या पवनकुमार यांच्यावर पडलेला दिसून येतो.

या कामी त्याला त्यांचे आईवडिल,शिक्षक कुस्ती कोच सुखदेव येरूडकर, दादासो लवटे,सागर देसाई,दयानंद खतकर सर,आदिंचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks