शिवाजी विद्यापीठात लोकनेते सदाशिवराव मंडलिक अध्यासन केंद्र चालू करा : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्ह्याचे दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये कर्तृत्वावर मंत्री म्हणून केलेले काम तसेच त्यांचा विचार- तत्त्वज्ञानाचा वारसा कायम पणे जपण्यासाठी शिवाजी विद्यापीठ मध्ये खासदार सदाशिवराव मंडलिक अध्यासन केंद्र (अभ्यास केंद्र )उभारणी करण्यात यावी. अशी मागणी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मा. खास. संजय मंडलिक यांच्याकडे सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक ऍड दयानंद पाटील नंद्याळकर मा.नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,मा.उपनगराध्यक्ष शिवाजीराव चौगुले , नगरसेवक जयसिंग भोसले, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक ,भगवान लोकरे इत्यादी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
दिवंगत खासदार मंडलिक साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेती, सहकार, सिंचन अशा अनेक क्षेत्रामध्ये दीपस्तंभा सारखे काम करून हरित क्रांती व औद्योगिक क्रांतीचे भरीव काम केले आहे.
स्वर्गीय मंडलिक साहेबांनी केलेले काम पुढील युवा पिढीसाठी दिशादर्शक ठरण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका , मुरगूड व कागल नगरपालिका या ठिकाणी त्यांचा स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याची उभारणणी करण्यात यावी. यासाठी स्वर्गीय मंडलिक ७ ऑक्टोबर जयंती दिन ते १० मार्च २०२६ पुण्यदिन या काळात कालबद्ध कृती आराखडा तयार करून हे कामे पूर्ण करण्यासाठी कागल तालुक्यातील तमाम स्वर्गीय सदाशिव मंडलिक प्रेमीं व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
या निवेदनाच्या प्रती माजी खासदार संजय बाबा घाटगे , शाहू समूहाचे नेते समरजीत राजे घाटगे यांना दिल्या आहेत.
या मागणी निवेदनावर श्रीनाथ सहकार समूहाचे नेते चंद्रकांत गवळी , दलित मित्र एस.आर.बाईत , दलित मित्र प्रा. डी.डी. चौगुले , प्रा.जीवनराव साळोखे , डॉ.शिवाजीराव होडगे , केशव काका पाटील , देवानंद पाटील, एकनाथ पोतदार , मारुती चोथे ,पी.डी. पाटील , धनाजी काटे ,आर. एस.पाटील , संभाजी मोरे इत्यादी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.