मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड तालुका कागल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दत्ता बाळ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्राचार्य एस पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमे ची भेट म्हणून पेन दिला व आशीर्वाद घेतले. उप मुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, उपप्राचार्य एम.डी खाटांगळे, पर्यवेक्षक एस डी साठी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत समीर कटके यांनी तर प्रास्ताविक एम बी टिपुगडे यांनी मानले यावेळी श्रीकांत कुंभार, पी एस पाटील, वाय ई देशमुख, टी एस पाटील, नंदकुमार गुरव, अमित भोई, सुधाकर निर्मळे, आनंदा मांगोरे, शशिकांत कोंडेकर, महादेव खराडे आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते. आभार ए एस कळंत्रे यांनी मांडले.