प्रफुल्लित केंद्रातर्फे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना फराळ वाटप

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्रद्धा, समर्पण आणि भक्तिभावाने भरलेली वारी… टाळ मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात, आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालणारे हजारो वारकरी… या पवित्र आषाढी वारीच्या प्रवासात प्रफुल्लित केंद्रा तर्फे एक सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला.
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदवाळ गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पायी जाऊन दर्शन घेतात. पुईखडी येथील मैदानावर रिंगण सोहळा आयोजित केला जातो आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक जमा होतात. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी नाना पाटील नगर चौक व पुईखडी येथे प्रफुल्लित केंद्राच्या माध्यमातून या भाविकांसाठी फराळ आणि चहाचे वाटप करण्यात आले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या उपक्रमात प्रिन्स पाटील आणि श्री पाटील ही दोन लहान मुले उत्साहाने सर्व वारकऱ्यांना फराळ वाटत होती. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे व सेवाभावाचे सर्वत्र कौतुक झाले. इतक्या लहान वयात समाजाप्रती असलेली ही बांधिलकी आणि वारकऱ्यांप्रती दाखवलेला आदर, उपस्थित भाविकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला.
यावेळी संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पाटील, शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदीप पाटील, अध्यक्षा अल्फीया बागवान,,विकास जाधव,रेश्मा कातकर,बिस्मिल्ला नदाफ,श्रावणी पाडळकर,सिद्धेश चिले,बाळासाहेब बेळगावकर, सुरज पाटील,शिवानी पाटील,प्रशांत निकम यांनी परिश्रम घेतले.