दौंड तालुक्यातील मुलीवर झालेल्या अत्याचारातील नराधम आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी मुरगुड येथील शिवप्रेमींचे निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी कुटुंबासह निघालेल्या दौंड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अमीर पठाण आणि विकास सातपुते या नराधमांनी अत्याचार केला. कुटुंबाला लुटून त्यांना मारहाण करण्यात आली. नुकतीच पंढरपूरची वारी यात्रा पार पडली. या वारीसाठी लाखो भाविक दर्शनासाठी गेले होते मात्र अशा प्रकारच्या देवदर्शनासाठी जाणाऱ्यावर लुटून त्यांच्या मुलीवर अत्याचार करणे अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे अशा आरोपीना भर चौकात जोडे मारून फाशी दिली पाहिजे. आशा आशयाचे निवेदन मुरगूड शिवप्रेमी यांनी मुरगूड पोलीस स्टेशन यांना दिले.
यावेळी मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी ही मागणी संबंधित पोलीस स्टेशन कडे कळवून त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मागणी करू असे बोलताना सांगितले.
यावेळी सर्वच उपस्थितानी संतप्त भावना व्यक्त केल्या तसेच अशा प्रकारची कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आले.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, जगदीश गुरव, आनंदा रामाने, प्रफुल कांबळे, शिवाजी चौगुले, विनायक मेटकर, संकेत शहा, सागर भाट, सुशांत कोळी,राणा मांगले ,आदित्य साळुंखे, विनायक काकडे, वेदांत मंडलिक ,अथर्व कदम, ऋषिकेश रणवरे यांच्यासह शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.