बस्तवडे येथे आरोग्य शिबिर संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बस्तवडे ता. कागल येथील प्रतिष्ठित नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य स्मृतीशेष पुंडलिक श्रीपती कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अथायु हॉस्पिटल निपाणी यांच्यावतीने गावातील व परिसरातील लोकांच्यासाठी मुतखडा व लघवीची समस्या यावर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य समाज भूषण साताप्पा कांबळे यांनी केले होते.
यावेळी तब्बल ६० ते ७० लोकांनी मुतखडा व लघवीच्या समस्या इत्यादी बाबत तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना सातापा कांबळे यांनी गेल्या चार वर्षापासून स्मृतीशेष पुंडलिक श्रीपती कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध प्रकारचे आरोग्य शिबिर व सामाजिक कार्यक्रम व गावातील विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, रोपे वाटप कार्यक्रम घेण्यात येत असलेचे सांगितले.यामुळे या आरोग्य शिबिरा अंतर्गत लोकांच्या विविध आरोग्याच्या समस्या वर उपाय केला आहे.
यावेळी आरोग्य शिबिरास सामाजिक कार्यकर्ते माजी लोककल्याण समता प्रतिष्ठान अध्यक्ष व जि.प.सदस्य एच.जी.कांबळे , भारतीय बौद्ध महासभा महेश धम्मरक्षित नागेश कांबळे व्हनाळीकर , प्रबुद्ध चॅनेल प्रतिनिधी अजिंक्य कांबळे , सतीश कांबळे (चिखली), सरपंच अनिल कांबळे, मा.नगरसेवक दिलीप कांबळे, निवास कांबळे (सांगाव), प्राध्यापक अशोक कांबळे( मळगे) , राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाम कांबळे , विनोद कांबळे,भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष राधानगरी , बाळासो कांबळे( शिरोळ) , दिलीप कांबळे (कापशी) , जय दुर्गा माता पत संस्था व्हा. चेअरमन देवडकर मामा, संचालक तांबेकर , सचिव अजित ढोले यांचेसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी अथायु हॉस्पिटलचे अक्षता कामत , अश्विनी मंगसुळे, विशेष सहकार्य मार्केटिंग सौरभ जगदाळे यांच्या सहकार्यामुळेच हे आरोग्य शिबिर अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले. या कार्यक्रमाचे आभार सरपंच जयश्री कांबळे यांनी मांडले