कौलव हायस्कूल अँन्ड ज्युनियर कॉलेज कौलव व शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये वारकरी दिंडी आणि वृक्षदिंडी उत्साहात साजरी

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
कौलव येथील कौलव हायस्कूल अँन्ड ज्युनियर कॉलेज आणि शिवराज इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी आणि वृक्ष दिंडी काढण्यात आली.
या सर्व विद्यार्थी दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,हरी ओम विठ्ठला असा विठुरायाचा जयघोष व टाळ्यांचा निनाद केला या दिंडीत विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून, विठ्ठल -रुक्मीणिच्या तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज,संत जनाबाई अशा संतांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाचा करत त्यातून,”झाडे लावा,झाडे जगवा” असा वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती करत दिंडी गावातुन फिरवण्यात आली यावेळी दिंडीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिंडीचा समारोप फुगडी खेळत,रिंगण सोहळ्यांनी झाला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर जी भोसले, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे ,दिपक सोनाळकर, एकनाथ जाधव,अमोल लाड, रोहित पाटील,बी डी गोंगाणे,जी बी पाटील, एस डी पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षीका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.