मेतके येथे चिकोत्रा नदीवर पूल होणे संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लक्षवेधी आंदोलन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मेतके (ता. कागल) येथील चिकोत्रा नदीवर पूल होणे संदर्भात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. संत सद्गुरु बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेतके येथे चिकोत्रा नदीवरती सध्या असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा खूप धोकादायक आहे.
मेतके येथील बाळूमामा मंदिराकडे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा असे अनेक राज्यातून लाखो भाविक येतात ते याच अरुंद बंधाऱ्यावरून येजा करतात. परंतु पावसाळ्यामध्ये व इतर वेळी या बंधाऱ्याला संरक्षण कठडा नसल्याने व रुंदी ही अत्यंत कमी असल्यामुळे दोन वाहने यावरून पास होतच नाहीत.
त्याचबरोबर या बंधाऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा वाहने थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे एकूणच हा सर्व वाहतुकीचा प्रकार अत्यंत धोकादायक बनलेला असून, मागीलच महिन्यात मेतके गावचे बजरंग जाधव हे टू व्हीलर वरून जात असताना नदीमध्ये पडले व वाहत थोड्या अंतरावरती गेले. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे व त्यांच्या चिकाटीमुळे त्यांचे प्राण वाचले.
या प्रकाराकडे शासनाने गांभीर्याने पाहून तत्काळ येथे नवीन पूल मंजुरी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज शनिवार दि. 5/7/2025 रोजी दुपारी एक वाजता मेतके येथील बंधाऱ्यावर लक्ष वेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जयसिंग टिकले,उप तालुकाप्रमुख समीर देसाई,विभाग प्रमुख नितीन भोकरे,विभाग विभाग प्रमुख अमृत पाटणकर,विभागप्रमुख संदीप कांबळे, विभाग प्रमुख राजू साबळे, मुरगुड शहर प्रमुख विजय भोई, वाहतूक अध्यक्ष नितीश डावरे,महेश जाधव,वैभव कांबळे, निखिल कुरणे, मारुती सूर्यवंशी,उत्तम भामरे, सदानंद देसाई, बजरंग जाधव, नामदेव जाधव, संजय भारमल, मेतके पोलीस पाटील, दयानंद दुर्गुडे,अनिल शेट्टी, अमित भोई ,महादेव चव्हाण, गुंडू भाऊ नलवडे,राजाराम सुतार, शिवलिंग परमणे,शिवसैनिक व मेतके ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.