ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० जुलै रोजी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता.कागल येथिल नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळख असणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४-२५ सालाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० जुलै रोजी दुपारी ठिक १२ वाजून ३० मिनिटानीं श्री लक्ष्मी नारायण नागरी सह .पतसंस्थेच्या हॉलमध्ये बोलविण्यात आली आहे .

संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि. १६ / ७ / २०२५ पर्यंत संस्थेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात व २० जुलैच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , व्हा. चेअरमन प्रकाश सणगर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks