ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठुरायाच्या आषाढी पालखीचे मुरगूड मध्ये जागोजागी भावभक्तीने स्वागत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने मुरगूड मधील विठ्ठल मंदिरा पासून विठ्ठल रूक्मिणी ची शानदार पालखी काढण्यात आली.अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.

” विठु माऊली तू माऊली जगाची

राजा तू पंढरीचा..राजा तू पंढरीचा

अवघे गर्जे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर.”

अशा भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पालखीचे स्वागत केले.आरती केली.गाव भागातील अंबाबाई मंदिर,राम मंदिर,जुन्या पोलिस ठाण्यातील दत्त मंदिर,हनुमान मंदिर, राणाप्रताप चौक,आत्मरूप गणेश मंदिर ,अशा सर्व ठिकाणी पालखीची आरती झाली.वारकरी पंथाच्या भक्तांनी टाळ मृदुंगाच्या तालावर रिंगण केले.फुगडी घातली.भजने म्हंटली. ठिकठिकाणी खिचडी केळे दूध राजगिरी लाडू बटाटे वेफर्स वाटप भक्त करत होते.

परम विठ्ठल भक्त व आंतर राष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ.श्रीकृष्ण देखमुख साहेब यांच्या निवासस्थळी पालखी पोचली आणि भक्तीचा पूर ओसंडून वाहू लागला.यावेळी मुरगूड मधील एम. जे. ऍग्रो व लकी सेवा केंद्र याचेवतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

या अखंड पालखी मिरवणुकीत विश्वास रावण, धोंडीराम राऊत, शामराव मेंडके , धोंडीराम खैरे, धोंडीराम मकानदार , सुहास खराडे, भाऊ येरुडकर, मारुती शेट्टी, संतोष लोहार, साताप्पा मेंडके ,महादेव वंडकर, चंद्रकांत तिकोडे,श्रीरंग गुरव सचिन गुरव,निंगाप्पा सिद्धाप्पा नवरकिल्ले , प्रकाश मगदूम, कृष्णा कुंभार, शिवाजी गोंधळी, विठ्ठल भुते,सर्जेराव भाट, जावेद मकानदार यांचेसह शेकडो भाविक उपस्थिती होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks