ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविध शारीरिक , मानसिक आरोग्यावर योगा सर्वोत्तम उपाय : माजी प्राचार्य महादेव कानकेकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

लोकांच्या विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मात करण्यासाठी योगा हा आज सर्वोत्तम उपाय ठरला असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी केले.

शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या एनसीसी छात्रांनी योगा डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अध्यापिका सौ. स्मिता देसाई होत्या .

यावेळी माजी प्राचार्य कानकेकर म्हणाले , विद्यार्थ्यांनी केवळ योग दिन साजरा न करता दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याची नितांत गरज आहे .योगामुळे शरीर निरोगी , मनाची एकाग्रता व तणावमुक्त होण्यास मदत होते . यावेळी एनसीसी कमांडर रविंद्र जालीमसर व एनसीसी छात्र उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks